agriculture fund : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारनं एक पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यास असंघटित क्षेत्रातील कामगाराला 2 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकणार आहे. हे दोन लाख रुपये मिळविण्यासाठी तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणे आवश्यक आहे. हे ई श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी कशी करायची याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
कर्ज माफी योजनेची ८वी गावानुसार पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
ई-श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढायचं?
- यासाठी तुम्हाला सर्वात शेवटी दिलेल्या वेबसाईटवर जावे लागेल
- या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Register on e-shram नावाचा रकाना दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे.इथं Self Registration या रकान्यात आधारशी लिंक मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा टाकायचा आहे.
- त्यानंतर दोन्ही पर्यायांपुढील NO या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि मग Send OTP वर क्लिक करायचं आहे.त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट म्हणायचं आहे.
- पुढे आधार नंबर टाकायचा आहे व ओटीपी पर्यायावरील बरोबरची टिक तशीच ठेवायची आहे आणि मग कॅप्चा टाकायचा आहे.
- पुढे तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाकून validate वर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर continue to other details वर क्लिक करायचं आहे.
SBI Mudra Yojana मुद्रा लोन योजनेद्वारे यांना मिळणार १ लाख रुपये कर्ज
- त्यानंतर लग्नाचं स्टेटस, वडिलांचं नाव आणि सामाजिक प्रवर्ग टाकायचा आहे.
- त्यानंतर नॉमिनीचे डिटेल्स टाकायचे आहेत. यात नॉमिनीचं नाव, त्यांची जन्मतारीख, लिंग आणि तुमच्यासोबतचं नातं निवडायचं आहे. मग save and continue वर क्लिक करायचं आहे.
- पुढे पत्त्यासंदर्भात माहिती भरायची आहे. यात सुरुवातीला राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर सध्याचा पत्ता सांगायचा आहे. यात शहरी भागासाठी urban आणि ग्रामीण भागासाठी rural पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका आणि पिनकोड टाकायचा आहे.
- त्यानंतर मग तुम्ही याठिकाणी किती वर्षापासून राहता ते सांगायचं आहे. हे झालं की मग परमानंट अड्रेस टाकायचा आहे. यात शहरी भागासाठी urban आणि ग्रामीण भागासाठी rural पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका आणि पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे Agriculture Loan
नवीन ट्रॅक्टर खरेदी साठी ९० टक्के अनुदान अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- आता शैक्षणिक माहीत भरायची आहे. इथं सुरुवातीला तुमचं शिक्षण किती झालं ते निवडायचं आहे आणि मग दरमहा किती कमावता तोही आकडा निवडायचा आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे.
- पुढे ऑक्युपेशन आणि स्किल या पेजवर प्रायमरी ऑक्युपेशनमध्ये तुम्ही सध्या काय व्यवसाय करता ते सांगायचं आहे आणि मग किती वर्षांचा अनुभव आहे तो आकडा निवडायचा आहे. अजून दुसरा व्यवसाय करत असाल तर ते सेकंडरी ऑक्युपेशनमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स टाकायचे आहेत.
- यात बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे. तो पुन्हा टाकून कन्मफ करायचा आहे. पुढे खातेदाराचं नाव, बँकेचा आयएफएससी कोड, बँकेचं नाव आणि शाखेचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे.
- पुढे आता तुम्ही नोंदणी करताना जी माहिती भरली ती एकाच ठिकाणी दाखवली जाईल. ती वाचून घ्यायची आहे आणि शेवटी मी भरलेली सगळी माहिती खरी आहे, अशा आशयच्या डिक्लेरेशनवर टिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचं ई-श्रम कार्ड स्क्रीनवर दिसेल. स्क्रीनवरील उजवीकडच्या Download UAN कार्डवर क्लिक केलं की तुमचं ई-श्रम कार्ड डाऊनलोड होईल.
- या पेजवर सर्वांत खाली असलेल्या Complete registration वर क्लिक केलं की तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल agriculture fund
ई-श्रम कार्ड अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
[ad_2]
मित्रांनो, Loksutra.in वरील हि माहिती आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा.